आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Achieves More Through Debates Than Disturbances: Arun Jaitley News In Marathi

विरोधकांना चर्चेतून बरेच साध्य झाले असते - अरुण जेटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संपुआच्या दुसर्‍या टप्प्यातील सरकारच्या कार्यकाळात संसदेतील बराच वेळ गोंधळात वाया गेल्याची उपरती भाजप नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना झाली आहे. गेल्या पाच वर्षांत संघर्षाच्या राजकारणामुळे अमूल्य वेळ वाया गेला. या कालावधीत विरोधकांना गोंधळातून नव्हे, चर्चेतून बरेच काही साध्य झाल्याची कबुली जेटली यांनी दिली.

राज्यसभेतील अनेक महत्त्वपूर्ण चर्चांची आठवण काढताना जेटली म्हणाले, चर्चेतूनच टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याची वस्तुस्थिती उघड होण्यास मदत झाली. शर्म-अल-शेखमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग व पाकिस्तानी पंतप्रधानांनी प्रसिद्ध केलेल्या वादग्रस्त निवेदनावर सरकारला खुलासा देणे भाग पडले. मात्र, पक्षीय राजकारणातील संघर्ष आणि वारंवार होणार्‍या गोंधळामुळे संसदेचा वेळ वाया गेल्याबद्दल खेद वाटतो. विरोधकांना चांगल्या चर्चांतून जे साध्य होते ते गोंधळातून मिळत नाही, यात शंका नाही.

2009 मध्ये हिवाळी अधिवेशनातील तीन दिवसांच्या चर्चेनंतर टूजी स्पेक्ट्रम वाटपाचे वास्तव बाहेर आले. तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा यांची आपली बाजू मांडताना त्रेधा उडाली. तत्पूर्वी अनेक गोष्टींतील वास्तव समोर आले नव्हते, असे जेटली म्हणाले.