आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Criticises Sushma Swaraj For Her Statement That Bhagwad Gita Should Be Declared As A National Scripture

\'भगद्गगीते\'वरुन टीएमसी - काँग्रेसची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि विश्व हिंदू परिषदचे नेते अशोक सिंघल यांनी हिंदू धर्मग्रंथ भगद्गीता राष्ट्रीय ग्रंथ करण्याची मागणी केली आहे. त्याला तृणमूल काँग्रेसने कडाडून विरोध करत भारताचा राष्ट्रीय ग्रंथ देशाचे संविधान असल्याचे म्हटले आहे. तर, काँग्रेसने स्वराज यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याची टिप्पणी केली आहे.
काय म्हणाल्या होत्या स्वराज
दिल्लीत रविवारी गीता प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वराज म्हणाल्या की, मी परराष्ट्रमंत्री म्हणून नव्हे तर गीतेनुसार जीवन जगणारी साधक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. गीतेमुळेच कुठल्याही अडचणींशिवाय मला परराष्ट्र मंत्रिपदाच्या आव्हानांचा सामना करणे शक्य होत आहे. गीता हा जीवनमार्ग आहे. जीवनातील सर्व समस्या आणि प्रश्नांची उत्तरे गीतेत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनीच गीतेला महत्त्व दिल्याने हिंदूत्ववादी संघटनांना जोर चढला आणि त्यांनी राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल म्हणाले, की सरकारने गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावे.
स्वराज म्हणाल्या, मोदींनी ओबामा यांना गीता भेट देऊन त्यास अनौपचारिक राष्ट्रीय दर्जा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, आम्ही सर्व धर्मग्रंथाचा आदर करतो पण लोकशाही संविधन हाच पवित्र आणि श्रेष्ठ ग्रंथ आहे.

राज्यघटनाच पवित्र ग्रंथ - ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी म्हणाल्या, कुराण, पुराण, वेद, वेदांत, बायबल, गुरू ग्रंथसाहेब, गीता हे सगळेच धर्मग्रंथ आमच्यासाठी पवित्र आहेत. पण लोकशाही राष्ट्रात राज्यघटना हाच राष्ट्रीय आणि पवित्र ग्रंथ असायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणातही देशाची राज्यघटनाच माझ्यासाठी सर्वात पवित्र ग्रंथ असल्याचे याआधी म्हटले आहे. आता ते काय भूमिका घेतात हे पाहाणे महत्त्वाचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये, गीता हा धर्मग्रंथ की जीवनग्रंथ ?