आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा निर्णय घेण्यासाठी सोनियांनी बोलवली 17 पक्षांची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली- राष्ट्रपती पदाचा उमेदवारासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस जवळ येत असतानाच विरोधी पक्षांनी आपला उमेदवार ठरविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सोनिया गांधींनी बुधवारी संध्याकाळी 4 वाजता यासाठी 17 पक्षांची बैठक बोलवली आहे. मागील महिन्यात काँग्रेसने राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरविण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना लंचला बोलवले होते. या बैठकीत बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, एआयएएमडीके यांना सोडून 14 पक्षांचे नेते सामील झाले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत 24 जुलैला संपत आहे. तत्पूर्वी 17 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.  

UPA-NDA ने बनवली समिती

#UPA

- विरोधी पक्षांनी राष्ट्रपती पदावर चर्चा करण्यासाठी 10 जणांची समिती बनवली आहे. यात काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद, मल्लिकार्जुन खडगे, जेडीयू नेते शरद यादव, राजद नेते लालू प्रसाद यादव, सीपीआई नेते सीताराम येचुरी, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, बसप नेते सतीश चंद्र मिश्रा, डीएमके नेते आर. एस. भारती आणि एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे.
- विरोधी पक्ष संयुक्त उमेदवार देण्याबाबत आग्रही असून पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यूपीएचे उमेदवार असू शकतात.
 
#NDA

- भाजपने उमेदवार निवडण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू आणि अरुण जेटली यांची समिती बनवली आहे. ही समिती सहयोगी पक्षांसोबत चर्चा करुन राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवेल.
- शिवसेनेने मोहन भागवतांचे नाव सुचवले होते पण अमित शहा आणि खुद्द भागवत यांनी याला नकार दिला आहे. लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बाबरी मशीद पाडल्याचा खटला सुरु आहे मात्र ते राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतात. 
बातम्या आणखी आहेत...