आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणुकीवर अधीसूचना जाहीर; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या हालचालींनाही वेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपती निवडणुकीचे नोटीफिकेशन बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. (फाईल) - Divya Marathi
राष्ट्रपती निवडणुकीचे नोटीफिकेशन बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. (फाईल)
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीसाठी अधीसूचना बुधवारी जाहीर केली. त्यानुसार, सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 28 जून आहे. राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निवडण्यास सत्ताधारी पक्षांसह विरोधकांच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे. त्यातच राष्ट्रपती निवडणूक सर्व संमतीने बिनविरोध होणार अशी चर्चाही सुरू आहे.
 
सर्व पक्षांच्या संमतीने निवडणार राष्ट्रपती?
भारताचे पुढचे राष्ट्रपती सर्व पक्षीयांच्या संमतीने ठरण्याची शक्यता आहे. बुधवारी याचे संकेत तेव्हा मिळाले जेव्हा समोर आले की भाजपची एक समिती शुक्रवारी सोनिया गांधी आणि सीताराम येचुरी यांची भेट घेणार आहे. या समितीत राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि एम. व्यंकय्या नायडू यांचा समावेश आहे. याच समितीवर राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची निवड बिनविरोध व्हावी यासाठीच राजनाथ सिंह - व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांतील नेते प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), सतीश मिश्रा (बसपा) यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने नोटीस जारी केली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 28 जून आहे.
 
संमती न झाल्यास राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा
- निवडणूक आयोगाच्या सूचना - 14 जून 
- उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख - 28 जून
- उमेदवार अर्ज पडताळणी - 29 जून
- उमेदवारी परत घेण्यासाठी शेवटची तारीख 1 जुलै
- मतदान (आवश्यक झाल्यास) - 17 जुलै सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 पर्यंत
- मतमोजणी (आवश्यक झाल्यास) - 20 जुलै सकाळी 11 पासून

मतदानाची वेळ आल्यास 13 टक्के मते ठरणार महत्वाची
एनडीए सरकारला आपल्या पसंतीचे राष्ट्रपती निवडण्यासाठी केवळ 20 हजार मतांची आवश्यकता आहे. यासाठी संयुक्त लोकशाही आघाडीला बिगर यूपीए आणि बिगर एनडीए घटक पक्षांचा शोध घ्यावा लागणार आहे. या पक्षांचा मतांचा आकडा 13 टक्के आहे. हेच 13 टक्के राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल ठरवणार असे सांगितले जात आहे.
 
मतांचे विभाजन कसे?
- खासदार - एका खासदाराच्या मताची व्हॅल्यू एकूण खासदारांच्या संख्येने भाग देऊन काढली जाते. त्यानुसार, एका खासदाराच्या मताचे मूल्य 708 असे सूत्र आहे. 
- आमदार - राज्याच्या लोकसंख्या किंवा तेथील एकूण आमदारांची संख्या गुणीले 1000 असे आहे.
 
किती मते आवश्यक?
- कुठल्याही पक्षाला आपल्या पसंतीचे राष्ट्रपती निवडून देण्यासाठी 50 टक्के अर्थातच 5,49,442 मते आवश्यक आहेत. 
- देशात एकूण 4114 आमदार असून त्यांच्या मतांचे मूल्य 5,49.474 एवढे आहे. तसेच एकूण खासदारांच्या मतांचे मूल्य 5,48,408 इतके आहे. खासदार आणि आमदारांची एकूण व्हॅल्यू 10,98,882 एवढी आहे.
बातम्या आणखी आहेत...