आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभाध्यक्षंच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन, धरपकड सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसच्या 25 खासदारांच्या निलंबनाविरोधात सलग दुसऱ्या दिवशी (बुधवार) संसद भवन परिसरात आंदोलन करण्यात आले. यात काँग्रेससह जनता दल संयुक्त (जेडीयू), सर्व डावे पक्ष सहभागी झाले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकार आणि विरोधक दोघेही आपापल्या भूमिकांवर अडून आहेत. यामुळे काही दिवसांपासून दोन्ही सभागृहांमध्ये काम होत नाही. कोणीही नमते घेण्यास तयार नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचे उरलेले दिवसही वाहून जाण्याची शक्यता अधिक आहे. divyamarathi.com ने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांची भूमिका जाणून घेतली. भाजप सोडल्यास एकही पक्ष काँग्रेसच्या 25 खासदारांचे निलंबन योग्य असल्याचे मानायला तयार नाही. सीपीएम नेते सीताराम येचूरी म्हणाले, लोकसभाध्यक्षांच्या कठोर भूमिकेविरोधात सर्व विरोधीक्ष एकत्र येऊन त्यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणू शकतात. सर्व पक्षांशी याबाबत बोलणे सुरु आहे.
 
विरोधक एकत्र
मंगळवारी भाजपचे निकटवर्तीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व पक्षांनीही निलंबन रद्द करण्याची गरज असल्याचे सरकारला सांगितले. बीजू जनता दलाचे तथागत सत्यपथी यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन निलंबनाचा कालावधी पाच दिवसांवरुन एका दिवसावर आणला पाहिजे, असा सल्ला दिला. एआयएडीएमके नेत्यांचे म्हणणे आहे, की  निलंबनामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादव यांचाही सूर एका दिवसात पालटला. काँग्रेसने केलेल्या सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणीला विरोध करणारे यादव काँग्रेस सदस्यांचे निलंबन चुकीचे असल्याचे म्हणाले. लोकसभाध्यक्ष मागे हटायला तयार नसल्याचे पाहून त्यांनी समाजवादीच्या खासदारांसह संसदेवर बहिष्कार टाकला.
बातम्या आणखी आहेत...