आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेक्षक गॅलरीतून एकाचा उडी मारण्याचा प्रयत्न, गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज स्थगित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेत शुक्रवारी एक अजब प्रकार घडला. एका व्यक्तीने सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले. यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आले होते.

नोटबंदी आणि सभागृहात कामकाज होत नसल्याचा राग
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोटबंदीला विरोध करत उत्तरप्रदेशातून आलेल्या राकेशसिंह बघैल या व्यक्तीने प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
- राकेशसिंहने नोटबंदीविरोधात घोषणाबाजी केली आणि उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच पकडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
- सुरक्षा रक्षक त्याची चौकशी करीत आहेत. त्याच्याकडे बुलंदशहरचे खासदार भोलासिंह यांची स्वाक्षरी असलेला कागद सापडला आहे.
- सुरक्षा रक्षक त्याला लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या समोर हजर करतील. महाजन त्याच्यावरील कारवाईचा निर्णय घेतील.
गुरुवारी काय झाले..
नोटबंदीवर पंतप्रधान संसदेत बोलत नाहीत आणि विरोधक कोणाला बोलू देत नाही ही परिस्थितीत शुक्रवारीही कायम आहे. विरोधीपक्ष पंतप्रधानांच्या उपस्थितीशिवाय चर्चेला तयार नाही. गुरुवारी मोदी एक तासांसाठी राज्यसभेत आले होते. लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी स्पिकरच्या दिशेने कागद फाडून फेकल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले होते.
गुरुवारी दुपारी १२ वाजता नरेंद्र मोदी राज्यसभे पोहोचले होते. त्यानंतर नोटबंदीवर चर्चा सुरु झाली होती.

- काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटबंदीमुळे सामान्यांना मोठा त्रास होत असल्याचे सांगत, जगात अशा पद्धतीने कोणत्या देशाने निर्णय घेतला होता, ते सांगण्याचे आव्हान मोदींना केले होते.
- नरेश अग्रवाल म्हणाले, बरे झाले मोदींनी निर्णयाबद्दल जेटलींना काही सांगितले नाही, नाही तर त्यांनी माझ्या कानात सांगितले असते, असे म्हणत चिमटा घेतला.
बातम्या आणखी आहेत...