आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात हिंसाचारामुळे भीतीचे वातावरण; विरोधक राष्ट्रपतींना भेटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन देशातील हिंसाचाराच्या घटना, गोरक्षकांचे हल्ले व असंतोषाचा आवाज दडपून टाकला जात असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची तक्रार राष्ट्रपतींकडे केली. 

ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्या जात असल्याची तक्रारही त्यांनी केली.  डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ‘देशात कायद्याचे राज्य’ अबाधित राखण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा आग्रह धरला.
बातम्या आणखी आहेत...