आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती पदासाठी विरोधकांची महाआघाडी, सोनियांच्या लंचमध्ये 17 पक्षांचे नेते एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विरोधी पक्षांनी राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दिली.
 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या लंचमध्ये मनमोहनसिंग, राहुल गांधी, शरद यादव, शरद पवार, अखिलेश यादव,  मायावती, लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी, उमर अब्दुल्ला, कनिमोझी, डी. राजांसह १७ पक्षांचे ३० हून अधिक नेते सहभागी झाले होते.  
 
एरवी राजकीय आखाड्यात परस्परांचे विरोधक असलेले बसपा, सपा, तृणमूल, डावे पक्ष लंचच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यांनी एकतेचे दर्शन घडवले. ही बैठक राष्ट्रपती निवडणुकीबाबत सहमती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्याशिवाय काँग्रेस  या महाआघाडीला हिमाचल, गुजरात, कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नेऊ इच्छिते. 
 
राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून महात्मा गांधी यांचे पणतू गोपाळकृष्ण गांधी, जदयू नेता शरद यादव, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नावांवर चर्चा झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुखर्जी यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी प्रस्ताव मांडला. मात्र नितीशकुमार लंचमध्ये सहभागी झाले नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. आता विरोधकांनी एकजूट दाखवली आहे.
बातम्या आणखी आहेत...