आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Parties Opposing Discussion With Pakistani Prime Minister Sharif

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतच्या चर्चेस विरोधी पक्षांचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान मनमोहन सिंग पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यासाठी रवाना झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतच्या चर्चेस विरोधी पक्षांनी विरोध दर्शविल्यानंतरही सिंग-शरीफ चर्चा निश्चित झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सरकारने त्याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे.


प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाच भारतीय जवानांची हत्या तसेच शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन केल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानशी चर्चा न करण्यासाठी सरकारवर दबाव होता. मुख्य विरोधी पक्ष भाजपसह विविध पक्षांनी शांततेसाठी पाकिस्तानवर अटी लादल्याशिवाय चर्चा केली जाऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करत सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतला. डॉ. सिंग न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्‍ट्राच्या आमसभेत भाषण करणार आहेत. याबरोबर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आदी देशांतील नेत्यांशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल.


ओबामांशी 20 मिनिटे चर्चा
डॉ. सिंग अमेरिकी राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी 27 सप्टेंबर रोजी व्हाइट हाऊसमध्ये चर्चा करतील. त्यांच्यात साधारण 20 मिनिटे चर्चा होईल. यानंतर ओबामा सिंग यांना मेजवानी देतील आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल.