आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opposition Protest At Gandhi Statue Inside Parliament Premises Over The Demonetisation Issue

नोटबंदी 30 Days: विरोधकांचा काळा दिवस, खासदार मान निलंबित, संसदेचे चित्रिकरण भोवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंजाबमधील संगरुरचे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांना संसद परिसराचे चित्रिकरण चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी भगवंत मान यांना संसदीय समितीने दोषी ठरवले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी खासदार मान यांना निलंबित करण्यात आले आहे. संसदीय समितीने हा निर्णय दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारचा हा मुर्खपणा
राहुल गांधी म्हणाले, नोटबंदीमुळे शेतकरी आणि गरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधकांनी सकाळी गांधी पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून आंदोलन केले. काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षाने आज काळादिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या नोटबंदी निर्णयाला आज एक महिना पूर्ण होत आहे. दरम्यान राज्यसभेत नोटबंदीवरुन गदारोळ होऊन दुपारी 12 वाजता सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजतापर्यंत स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेत कामकाज सुरु आहे. मात्र पंतप्रधान आजही राज्यसभेत पोहोचले नाही.
नोटबंदीविरोधात विरोधकांनी आज काळादिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर विरोधी पक्षाचे खासदार तोंडावर काळ्या फिती बांधून आंदोलन करीत आहेत. राहुल गांधी म्हणाले, 'नोटबंदीच्या निर्णाला अतिशय परिपक्व आणि बोल्ड सांगितले जात आहे, मुळात हा मुर्खपणाचा निर्णय आहे.' केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी विरोधकांचे आंदोलन हे मीडियामध्ये राहाण्यासाठीचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले सरकार सभागृहात चर्चेसाठी तयार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... आणखी काय म्हणाले राहुल गांधी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...