नवी दिल्ली - संसदीय कामकाज समिती (सीसीपीए)ने 26 नाव्हेंबर ते 23 नाव्हेंबरदरम्यान अशा 28 दिवस संसदेशच्या हिवाळी अधिवेशाचा कालावधी निश्चित केला आहे. मात्र, या अधिवेशानात असहिष्णुतेचा मुद्दा तापणार असून, यातच अधिक वेळ वाया जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, 26 आणि 27 नाव्हेंबर या पहिल्या दोन दिवसांत डॉ. आंबेडकरांचे विचार, कार्य व त्यांचे भारतीय राज्यघटना निर्मितीच्या योगदानावर चर्चा करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या दोन्ही दिवशी प्रश्नोत्तराचा तास होणार नाहीत. हे दोनच दिवस अधिवेशानादरम्यान शांततेत जातील, असे चित्र आहे.
सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची तयारी
> 30 नाव्हेंबरपासून हे अधिवेश तापणार आहे. यामध्ये सरकारला असहिष्णुतेच्या कारणामुळे घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
> सीपीएम नेता सीताराम येन्चुरी यांनी सांगितले की, असहिष्णुतेवर चर्चा करण्यासाठी आम्ही कलम 168 नुसार राज्यसभेला नोटिस दिली आहे.
नोटिस स्वीकार झाल्यानंतर नियमाच्या कलम 170 नुसार चर्चा होईल.
> काँग्रेस नेता आनंद शर्मा म्हणाले, संसदेत असहिष्णुतेच्या विरोधात प्रस्ताव पारित व्हावा आणि कलम 170 नुसार चर्चा व्हावी.
चर्चेसाठी सरकार तयार
संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, ज्याही विषयावर विरोधक चर्चा करणार त्यासाठी आम्ही तयार आहोत. पण, कोणत्या नियमाने चर्चा होईल, हे सभापती (राज्यसभा) आणि स्पीकर (लोकसभा) यांच्यावर निर्धारित आहे.