आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनाम्यांवर काँग्रेस ठाम, इतर पक्ष नरमले, अाजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमधील सामना रंगला आहे. सुषमा स्वराज, वसुंधराराजे आणि शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्यांच्या मागणीवर काँग्रेस ठाम आहे.

राजीनामे नाही तर कामही होऊ देणार नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. मात्र, बहुतांश इतर विरोधी पक्ष या भूमिकेशी सहमत नाहीत. कामकाज न चालू देणे हा या मुद्द्यावरील तोडगा नाही; सर्व मुद्द्यांवर चर्चा व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.
संसदेतील कामकाज सुरळीत चालावे, असे २९ पक्षांचे म्हणणे असल्याचा दावा सरकारने केला. सोमवारी दोन सर्वपक्षीय बैठका झाल्या. दोन्हींतही कोंडी फुटू शकली नाही. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना सांगितले की, प्रत्येक मुद्द्यावर चर्चेची तयारी आहे. मात्र, संसद चालवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, कामकाज सुरळीत हवे असेल तर किमान तीन राजीनामे द्यावेच लागतील.

यांचा हवा राजीनामा
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज : ब्रिटनमध्ये ललित मोदीला प्रवास दस्तऐवज मिळवून देण्यात मदत.
-मुख्यमंत्री वसुंधरा राजे : ललित मोदीला ब्रिटनचा व्हिसा मिळवून देण्यात मदतीचा आरोप.
-मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान : मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा
-मुख्यमंत्री रमण सिंह : छत्तीसगडमधील तांदूळ घोटाळा
-मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी : डिग्री दाव्यांत खोटेपणा.
बातम्या आणखी आहेत...