आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांची सरकारविरुद्ध वज्रमूठ, लोकसभेतून सभात्याग, संसदेबाहेर निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केल्याच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. त्यांनी मंगळवारी लोकसभेतून सभात्याग केला, तर राज्यसभेचे कामकाज रोखून धरले. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने संसद भवन परिसरात संयुक्त निदर्शनेही केली.

दरम्यान, सरकार एक-दोन दिवसांत लोकसभा अध्यक्षांकडे काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेण्याची विनंती करू शकते.लोकसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, जदयू व मुस्लिम लीगने सभात्याग केला. राज्यसभेतही विरोधी पक्षांनी कामकाज रोखल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.

देशच राजीनामे मागतोय : राहुल
खासदार निलंबनाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निदर्शने केली. राहुल म्हणाले,‘काँग्रेस पक्षच तीन भाजप नेत्यांचे राजीनामे मागतोय असे नाही. देशच तशी मागणी करत आहे.’
सोनिया गांधी, राहुल गांधी, डॉ. मनमोहनसिंग निदर्शनांत सहभागी झाले.
------------------