आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्‍येत वादग्रस्त जागी निरीक्षक नेमण्याचे आदेश; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना कारवाईस सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादग्रस्त जागेच्या देखभालीसाठी १० दिवसांच्या आत २ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना (एडीजे) निरीक्षक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश बजावले आहेत. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण व एस. अब्दुल नजीर यांचे पीठ सोमवारी खटल्याची सुनावणी करत होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या वतीने हजर राकेश द्विवेदी यांनी सांगितले की, एक निरीक्षक निवृत्त झाले असून दुसऱ्याला उच्च न्यायालयात पदाेन्नती मिळाली आहे. संभाव्य निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी त्यांनी एडीजे व विशेष न्यायाधीशांची एक यादी पीठाला पाठवली आहे. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना यादीतून निवड करत दोन एडीजेंना निरीक्षक करण्यास सांगितले आहे.सर्वाेच्च न्यायालयाचे पीठ या प्रकरणाची अंतिम सुनावणी ५ सप्टेंबरपासून करत आहे.
बातम्या आणखी आहेत...