आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organised Sector Workers Now Get Per Month One Thousand As Pension

संघटित क्षेत्रातील कामगारांना दरमहा हजार रुपये मिळणार पेन्शन,अर्थ खात्याची मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संघटित क्षेत्रातील कामगारांना दरमहा किमान 1 हजार रुपये पेन्शन देण्याच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रस्तावावर गुरुवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले. सुमारे 27 लाखांवर पेन्शनधारकांना याचा फायदा होईल. तसेच भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत मूळ वेतनाची र्मयादा आता 6,500 रुपयांवरून 15 हजार रुपये करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
आज देशभरात 44 लाख पेन्शनरपैकी 5 लाख विधवांसह 27 लाख लोकांना 1 हजार रुपयांपेक्षाही कमी निवृत्तिवेतन मिळते. ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत मूळ वेतनाची र्मयादाही 15 हजार करण्यात आली.