आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Organiser Admits Worried Bjp Chose Bedi After Adverse Feedback From Field

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RSS चा भाजपला घरचा आहेर; मुखपत्रात म्हटले, पराभवाच्या भितीनेच किरण बेदींना आणले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत भाजपची स्थिती ठीक नसल्यामुळेच किरण बेदी यांना पक्षात सहभागी करून घेण्यात आल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ने मान्य केले आहे. संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एखा लेखात म्हटले आहे की, दिल्ली निवडणुकीत स्थिती आपच्या तुलनेत कमकुवत असल्याचे बाजप नेतृत्वाला जाणवले होते. त्यामुळेच किरण बेदींनी पक्षात आणण्यात आले आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारही बनवले.

लेखात म्हटले आहे की, 49 दिवसांच्या सरकारनंतर ‘आप’विरोधात नक्कीच लाट होती. पण तरीही दिल्लीत भाजपची स्थितीही फारशी चांगली नव्हती. ‘आप’ने सत्ता सोडल्याने मध्यमवर्गीयांना आपली फसवणूक झाल्याचे वाटत होते. पण भाजपबाबतही फारशी चांगली मते नसल्याचा फिडबॅक भाजप नेतृत्वाला मिळाला. त्यामुळे अखेरीस किरण बेदींना आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्ली कार्यकारिणीत होता रोष
या लेखानुसार जेव्हा किरण बेदींना पक्षात सहभागी करून सीएम पदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा भाजपच्या दिल्ली कार्यकारिणीत काही प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. पण पक्ष नेतृत्वाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. लेखात असेही म्हणण्यात आले की, सुरुवातीच्या काही गोंधळानंतर आता कुठे भाजपचा प्रचार योग्य मार्गाने सुरू झाला आहे. बेदींना भाजपमध्ये आणणे एक सकारात्मक पाऊल आहे. तसेच या लेखात असेही म्हटले आहे की, पंतप्रधानांनी सोशल मिडियाचा अत्यंत योग्य वापर केला. पण भाजप नेत्यांनी मात्र ट्वीटर आणि फेसबूकवर नकारात्मक कमेंटस् टाळायला हव्या.

ओबामांच्या दौऱ्याने फायदा होणार
मुखपत्राच्या दिल्ली व्युरोने लिहिलेल्या लेखात असेही म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. दिल्लीतील नागरिक अजूनही मोदींच्या मॅजिकची वाट पाहत असले तरी, ओबामांच्या तीन दिवसीय दौऱ्यात भारत आणि अमेरिकेतील व्यावसायिक नाते अधिक दृढ झाल्याने भाजपला त्याचा फायदा मिळेल असे म्हटले जात आहे.

‘आप’चे आव्हान
लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ छावणीच्या निवडणुकांमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मेहनतीच्या जोरावर पुन्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. त्यानुसार आता बूथ लेव्हलवर स्थिती मजबूत असल्याचे चित्र आहे. लेखानुसार झोपडपट्टी भाग, अवैध वस्त्या, अल्पसंख्यास (विशेषतः मुस्लीम) आणि काही मध्यमवर्गात ‘आप’ स्थिती मजबूत आहे. ‘ऑर्गनायझर’च्या लेखात असेही म्हटले आहे की, जो तरुण वर्ग सामाजिक संस्थांशी डोडला गेला आहे किंवा डाव्यांकडे ओढा आहे तेही आपचे समर्थक आहेत. मात्र त्याचवेळी 2013 मध्ये ज्या मध्यमवर्गाची आपला मते मिळाली होती, त्यांचा मात्र पार्टीकडे ओढा कमी झालेला आहे.