आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organizers Should Have To Clean Area After Programme

स्वच्छतेची जबाबदारी आयोजकांची, सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनापूर्वी घेणार अनामत रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सार्वजनिक सोहळे - कार्यक्रमांच्या आयोजनानंतर होणा-या अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी सरकारने नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, कार्यक्रमाच्या परवानगीच्या वेळेस १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम वसूल केली जाईल. कार्यक्रम संपल्याच्या ६ तासांत साफसफाई केली तरच ही अनामत रक्कम परत केली जाणार आहे. अन्यथा स्वच्छतेसाठी नगरपालिका ही रक्कम स्वत:कडेच ठेवेल.

नगरविकास मंत्रालयाने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तत्काळ प्रभावानुसार त्याच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.

तर मंजुरी नाही
अनामत रक्कम जमा न केल्यास आयोजकांना कार्यक्रमाची परवानगीच देण्यात येणार नाही. साफसफाईसाठी आयोजकांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. आयोजकांना स्वच्छतेसाठी पुरेसे स्वच्छता कामगार तैनात करावे लागणार आहेत.

कचरा न करण्याचे वचन
कचरा करणार नाही, असे वचन परवानगी घेताना आयोजकांना द्यावे लागेल. स्वच्छता केल्यानंतर आयोजनस्थळ सोडावे लागेल. ज्या ठिकाणी आयोजनाची परवानगी पोलिसांकडून देण्यात येते तेथे पोलिसांकडेच अनामत जमा करावी लागेल.

शौचालये हवीत
मंत्रालयाच्या दिशानिर्देशांनुसार, कार्यक्रमाचे आयोजन करणा-या आयोजकांना संबंधित ठिकाणी कचराकुंडी आणि शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागेल.

कारण काय
सार्वजनिक सोहळे व बैठकांनंतर आयोजन स्थळी पाण्याच्या बाटल्या, उरलेले सामान, वापरून झालेली फुले, पुष्पगुच्छ, पॅकेजिंग सामग्री, रॅपर आदी वस्तू तशाच विखुरलेल्या असतात. सार्वजनिक सुविधा नसल्याने जवळपासचे वातावरणही प्रदूषित होते.