आचार्य रजनीश उर्फ ओशो यांच्याबद्दल बरीच मतमतांतरे
आपणाला त्यांच्या चाहत्यांकडून अथवा त्यांच्या विरोधकांकडून ऐकायला मिळतील. ओशोंचे विचार विद्रोही होते. ते नेहमीच त्यांच्या वादग्रस्त प्रवचनातून, लेखांतून चर्चेत राहिले. त्यांचा धर्मांप्रतीचा दृष्टीकोन अत्यंत प्रखर आणि सडेतोड होता. त्यामुळे त्यांना अनेकांच्या रोषाचे कारण बनावे लागले. त्यांच्या नावावर चालणारे ओशो इंटरनॅशनल आश्रम हे फक्त भारतीय संस्कृतीच्या विरोधातच बोलत नाही तर, तो हिंदू धर्माचा अपमान करीत आहे असे ही म्हटले जाते. २०१३ मध्ये ओशो इंटरनॅशनलच्या 'ओशोटाइम्स' ब्लॉगमध्ये पोस्ट केलेल्या एका लेखात म्हटले आहे की, आपली मुले कितीही लहान असो, त्याच्या आई-वडिलांनी व कुटुंबियांनी सेक्सचे पूर्ण माहिती दिली पाहिजे. याच ब्लॉगवर काही महिन्यांपूर्वी पोस्ट केलेल्या लेखात हिंदू धर्मातील आराध्य दैवत शंकर आणि पार्वती यांचा अपमान केला होता.