आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ounting For DUSU Polls Begins, ABVP Leading The Starting Trend

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली विद्यापीठ निवडणूक: AAP साफ, ABVP ने सलग दुसऱ्या वर्षी फडकवला झेंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संसद निवडणूकीत विजयी झालेले एबीव्हीपीचे उमेदवार - Divya Marathi
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संसद निवडणूकीत विजयी झालेले एबीव्हीपीचे उमेदवार
नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संसदेच्या (DUSU) निवडणुकीत सलग दुसऱ्या वर्षी भारतीय जनता पक्ष प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) बाजी मारली आहे. एबीव्हीपीने सर्व जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. काँग्रेस प्रणित एनएसयूआय दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर दिल्लीत 67 विधानसभा मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेला (CYSS) या निवडणुकीत काही कमाल दाखवता आली नाही. ते प्रथमच दिल्ली विद्यापीठाची निवडणूक लढवत होते. या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते.

कोणी मारली बाजी
सतेंदर अवाना अध्यक्ष, सनी डेढा उपाध्यक्ष, अंजली राणा सचिव आणि छत्रपाल यादव सहसचिव पदी निवडून आले आहेत. या निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रथमच उतरलेली आपची विद्यार्थी संघटना सीवायएसएस काय कमाल दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र दिल्ली विधानसभेप्रमाणे ते येथे चमत्कार दाखवू शकले नाही.

भाजप कार्यालयात जल्लोष
निकालांची घोषणा झाल्यानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा झाला. कार्यालयाबाहेर उत्सवाचे वातावरण होते. चारही जागांवर एबीव्हीपीचे उमेदवार 4500 पेक्षा मोठ्या फरकाने विजयी झाले. अवानाला 20,439 मते मिळाली. त्याने एनएसयूआयच्या प्रदीप विजयारन याचा 6327 मतांनी पराभव केला. त्याला 14,112 मते मिळाली.

उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या सनी डेढाने गरिमा राणाचा 7570 मतांनी पराभव केला. एबीव्हीपीच्या सचिव पदाच्या उमेदवारने 4610 तर सह-सचिव पदाच्या उमेदवाराने 6065 मतांनी विजय मिळवला.

विजयानंतर सतेंदर अवाना म्हणाले, आपच्या उमेदवारांचे प्रयत्न बॅनरपर्यंतच सीमित होते. त्यांना ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नव्हती. आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांसोबत राहू आणि त्यांचे प्रश्न सोडवू.

जेएनयूचा निकाल रविवारी ?
दिल्ली विद्यापीठासोबतच जेएनयू विद्यार्थी संसदेसाठीही निवडणूक झाली होती. त्याचा निकाल रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जेएनयूवर एआयएसएने झेंडा फडकवला होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, एबीव्हीपीचा विजयी जल्लोष, अंजली राणांची सेल्फी