नवी दिल्ली - शंभरावर कॉर्पोरेट प्रमुखांनी भाजपचे सदस्यत्व घेतले. भाजपनुसार, लुफ्तान्सा एअरलाइन्सचे परवेज आलमगीर खान, कतार एअरलाइन्सचे भारतातील प्रमुख हेन्री मोझेस, एटीअँडटीच्या नीता अग्रवाल, आयकन ग्रुपचे जगप्रीत लांबा, कॉर्पोरेट अलायन्स ग्रुपचे कपिल कुमारिया, इंटर-ग्लोब टेक्नोचे अनिल पराशर, फोर्टिस रुग्णालयाचे अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. नवीन तलवार आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.