आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Over 50000 Crore Revenue Still To Come; CBDT Cancels All Leave

‘सीबीडीटी’तील सुट्या करवसुलीसाठी रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 31 मार्चपर्यंत 50 हजार कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. कर्मचार्‍यांनी वसुलीसाठी रात्रंदिवस कष्ट घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सीबीडीटीने या वर्षी 6.36 लाख कोटी रुपये करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्राप्तिकर विभागाच्या 20 मार्चच्या आकडेवारीनुसार या महिनाअखेरपर्यंत 50,204 कोटी रुपये करवसुली अपेक्षित धरण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागांचे आयुक्त, महासंचालकांसोबत सीबीडीटीने घेतलेल्या बैठकीत वसुलीसाठी सर्व कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्याचे आदेश बजावले आहेत. सीबीडीटीचे अध्यक्ष आर. के. तिवारी यांनी यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आहे. 31 मार्चपर्यंत अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. विभाग आगाऊ कर भरण्यासाठी आशादायी आहे, असे वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. महिनाअखेरीस शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी प्राप्तिकर कार्यालये सुरू राहणार आहेत.