आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIM नेते ओवेसींनी IS ला म्हटले \'कुत्ता\', मानवता धोक्यात आल्याचा दिला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ हैदराबाद - एमआयएम नेते खासदार असदुद्दीन ओवेसींनी आयएसआयएसला कडक शब्दात सुनावले आहे. त्यांनी आयएसला इशारा देताना 'जहन्नुम के कुत्ते' म्हणत भारतीय मुस्लिम तरुणांना आवाहन केले आहे, 'हा देश आपला आहे, आपण त्याच्यासोबत राहिले पाहिजे.'

ओवेसी म्हणाले- इस्लामसाठी मरु नका जगा
> आयएसआयएस भारतात आपली पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न करत असताना आणि हैदराबादमधून आयएस संशयित पकडले गेले असताना ओवेसींनी केलेल्या आवाहनला महत्त्व प्राप्त झाले आहे.
> तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले, 'इस्लामसाठी जगायला शिका. धर्मासाठी मरण्याची गरज नाही. मानवतेसाठी जीवन जगा.'
> आयएसआयएस बद्दल ओवेसी म्हणाले, हा जगापुढील सर्वात मोठो धोका आहे. यामुळे संपूर्ण मानवता धोक्यात आली आहे.

'अबु बकर अल बगदादीचे तुकडे-तुकडे करु'
> ओवेसी म्हणाले, मदिनामध्ये हल्ला करणारे लोक इस्लामचे शत्रू आहे. ज्या लोकांनी रोजे ठेवले नाही त्यांची रक्कामध्ये हत्या करण्यात आली. अशा लोकांचे तर तुकडे-तुकडे केले पाहिजे.
> ओवेसी म्हणाले, 'मी जाहीर करतो की जर अबू बकर अल बगदादी एखाद्या मुस्लिम व्यक्तीला भेटला तर त्याचे तुकडे-तुकडे केले जातील.'

मुस्लिमांच्या हातात शस्त्र नको
> आयएसवर निशाणा साधतानाच मुस्लिम तरुणांना दहशतवादापासून दुर राहाण्याचे आवाहन ओवेसींनी केले.
> ते म्हणाले, 'मुस्लिम तरुणांनी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. जर जिहाद करायचा असेल तर हातात शस्त्र घेऊ नका. गरीबी दूर करा. गरीब मुलांना शिक्षण द्या. हाच जिहाद आहे.'
> याआधी आयएसविरोधात वक्तव्य केल्यानंतर ओवेसींना धमकी आली होती.
> तसेच, हैदराबादमध्ये पकडण्यात आलेल्या संशयितांना लिगल एड पुरवण्यावरुनही त्यांच्यावर टीका झाली होती.
> ओवेसींवर झालेल्या टीकेला औरंगाबादचे एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, मुस्लिम तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वर्षात त्यांना तुरुंगात खितपत पडावे लागते.
> त्यामुळे निरपराधांना लवकर न्याय मिळावा यासाठी त्यांना कायदेशीर मदत झाली पाहिजे. जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...