आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'याकूब मुस्लिम असल्यानेच फाशी; मा‍त्र, राजीव गांधींच्या खुन्यांना का नाही?\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / हैदराबाद- याकूब मेमनच्या फाशीवर राजकारणही सुरू आहे. याकूब मुस्लिम असल्यानेच त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली, असा आरोप एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला. त्यावर ज्यांना न्यायपालिकेचा निकाल मंजूर नाही त्यांनी पाकिस्तानात जावे, असे भाजप खासदार साक्षी महाराज म्हणाले.

ओवेसी यांनी आपल्या फेसबुक पेजवर नऊ प्रकरणांचा हवाला दिला आहे. ओवेसी यांनी हैदराबादमधील रॅलीचा व्हिडिओही पोस्ट केला होता. त्यात ते म्हणत आहेत ,‘जर तुम्ही (सरकार) फाशीची शिक्षा देत असाल, तर सर्वांना द्या. धर्माला निशाणा बनवू नका. हाही दहशतवाद आहे. याकूबला फाशी देण्यापूर्वी पंतप्रधान राजीव गांधींचे हत्यारे संतन, मुरूगन, पेररिवलन यांना फाशी द्या.