आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P.C.Parikh News In Marathi, CBI, Coal Gate Scam, Divya Marathi

सीबीआयकडून माजी सचिव पारख यांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोळसा ब्लॉक वाटप घोटाळाप्रकरणी गुरुवारी कोळसा विभागाचे माजी सचिव पी. सी. पारख यांची चौकशी केली. ते चौकशीसाठी दुपारी सीबीआय मुख्यालयात पोहोचले. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना पारख म्हणाले की, ‘मला जे काही सांगायचे होते ते मी आधीच सांगितले आहे. आता सीबीआयचे अधिकारी माझ्याकडून काय जाणून घेतात ते पाहायचे.’

सीबीआयने पारख यांना समन्स जारी करून चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. सीबीआयच्या एफआयआरमध्ये पारख यांच्याविरुद्ध पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. त्यानुसार आदित्य बिर्ला समूहाची कंपनी हिंदाल्कोला पारख यांनी ओडिशातील कोळसा ब्लॉक वाटप करण्यात मदत केली होती.