आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • P.Chidambaram News In Marathi, Aircel, Maxis Case, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅक्सिसप्रकरण: पी. चिदंबरम यांनी एफआयपीबीला मंजुरी देणे, ही त्यांची मोठी चूक - सीबीआय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एअरसेल व मॅक्सिस प्रकरणाची सुनावणी करणा-या विशेष टू जी न्यायालयासमोर सीबीआयने सोमवारी आपली बाजू मांडली. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या करारात एफआयपीबीला मंजुरी देणे, ही त्यांची मोठी चूक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने दिलेल्या अहवालात म्हटले की, ८० कोटी डॉलर्सची (३५०० कोटी रुपये) गुंतवणूक अपेक्षित होती. २००६ मध्ये एअरसेल व मॅक्सिससोबत झालेल्या करारात चिदंबरम यांनी विदेशी गुंतवणूक विकास बोर्डाला (एफआयपीबीला) कोणत्या आधारावर मान्यता दिली.
या दिशेने तपास सुरू आहे.

अर्थमंत्र्यांना ६०० कोटी रुपयांपर्यंत मंजुरी देण्याचा अधिकार होता, मात्र हा करार ३५०० कोटी रुपयांचा असूनही हा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न सीबीआयने उपस्थित केलाय. ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या कराराला मान्यता देण्याचा अधिकार आर्थिक प्रकरणांच्या कॅबिनेट समितीलाच (सीसीईए) आहे.