आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Chidambaram Endorses Rahul For PM, Says Modi Not Stronger Than Advani

चिदंबरम युवराजाच्या पाठिशी, मोदींवर प्रहार; तरीही कॉंग्रेसनेच घेतला वक्तव्याचा समाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या टीकेमुळे कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. चिदंबरम यांनी एकिकडे मोदींवर टीका केली तर दुसरीकडे राहुल गांधी पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचे सांगून कॉंग्रेसला गोत्यात आणले आहे.

कॉंग्रेसमध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची पद्धत नाही, असे बहुतेक केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही राहुल गांधी पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचे जाहीर करून चिदंबरम यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. नरेंद्र मोदी हे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षा मोठे नेते नाहीत, असे सांगून चिदंबरम यांनी भाजपला डिचवले आहे.

त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन म्हणाले, की त्यांना भाजप आणि कॉंग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची तुलना करायची असेल. राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदी किती तरी सरस आहेत. त्यांनाच लोकांनी निवडून द्यावे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले होते. ते म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण नेतृत्वाला संधी द्यायला हवी. देशात सध्या उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीला कॉंग्रेस सरकार जबाबदार आहे, असे समजण्याचे कारण नाही. देशातील आघाडी सरकार, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे याला जबाबदार आहेत. येत्या निवडणुकीनंतर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चितच मदत होणार आहे.

चिदंबरम यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेस नेत्यानेच घेतला समाचार, वाचा पुढील स्लाईडवर