आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लोकलेखा\'चा RBI गव्हर्नरला सवाल- तुमच्यावर खटला दाखल करुन पदावरुन काढावे का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना संसदीय समितीने हजर राहाण्यास सांगितले आहे. - Divya Marathi
आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना संसदीय समितीने हजर राहाण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली - नोटबंदीच्या निर्णयाची चौकशी करीत असलेल्या संसदेच्या लोकलेखा समितीने (पीएसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना 10 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संसदीय समितीने त्यांना 20 तारखेला पाचारण केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.व्ही. थॉमस यांच्या नेतृत्वातील या समितीने पटेलांना नोटबंदीचा निर्णय कसा घेतला गेला आणि त्याचे देशावर काय परिणाम होणार हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. 
 
नोटबंदीनंतर चलनातील नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यावरुन विरोधीपक्षाने त्यांच्यावर टीका केली आहे. समितीने पटेलांना 10 प्रश्नांची यादी पाठवली आहे. त्यात नोटबंदीनंतर रद्द झालेले किती चलन बँकात जमा झाले, त्यात काळ्या पैशाचे प्रमाण किती आणि रिझर्व्ह बँकेने किती नवे चलन बाजारात आणले, याची विचारणा करण्यात आली आहे. 

लोकलेखा समितीने कोणते प्रश्न विचारले 
- नोटबंदीचा निर्णय घेत असताना आरबीआयने सांगितले होते का की यामुळे 86%  चलन रद्द होईल ? आरबीआय रद्द केलेल्या एवढ्या नोटा परत केव्हा चलनात आणेल ? 
- कोणत्या कायद्यानुसार लोकांच्या रोख रक्कम काढण्यावर बंधन घालण्यात आले होते ? जर तुम्ही नियम सांगू शकत नसाल तुमच्यावर खटला का चालवला जाऊ नये ? आणि पदाचा दुरुपयोग केल्यामुळे तुम्हाला पदच्यूत का करण्यात येऊ नये? 
- दोन महिन्यांमध्ये वारंवार नियम का बदल होते ? बोटांवर शाई लावण्याची कल्पना कोणत्या अधिकाऱ्याने दिली होती ? लग्न खर्चासाठी पैसे काढण्याचा आदेश कोणी तयार केला होता ? का हे सर्व सरकारने ठरविले होते ? 
- किती चलन बंद करण्यात आले आणि रद्द करण्यात आलेल्या चलनापैकी किती जमा झाले आहे ? 8 नोव्हेंबरला आरबीआयने सरकारला नोटबंदीचा सल्ला दिला तेव्हा किती चलन परत येण्याची आपेक्षा होती ? 
- 8 नोव्हेंबरच्या आरबीआयच्या आपतकालिन बैठकीसाठी सदस्यांना केव्हा नोटीस दिली गेली ? बैठकीला कोण-कोण उपस्थित होते ? बैठकीचा तपशील कुठे आहे ? 
- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की नोटबंदीचा निर्मय आरबीआय बोर्डने घेतला होता. सरकारने फक्त त्यांच्या सल्ल्यानुसार कारवाई केली. तुम्हाला हे मान्य आहे का ? 
- जर निर्णय आरबीआयचा होता तर नोटबंदी भारताच्या फायद्याची आहे हे केव्हा ठरविले गेले ? 
- एका रात्रीतून 500 - 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यामागे आरबीआयला कोणती मोठी समस्या वाटली होती ? 
- देशात फक्त 500 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आहे. असे असताना सर्वात मोठे चलन 86% असताना ते बंद करण्याची अशी कोणती गरज निर्माण झाली होती ? 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)