आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टुंडावर पेसमेकरची शस्त्रक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अब्दुल करीम टुंडाच्या हृदयात शनिवारी एम्स रुग्णालयात ‘पेसमेकर’ बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, 70 वर्षांच्या टुंडाला गुरुवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याने हृदयात वेदना होत असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी दुपारी त्याला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. त्याचे हृदय पूर्णपणे जाम असल्याचे आढळून आले. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. टुंडाला दुपारी कॅथलॅबमध्ये हलवण्यात आले. येथे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. नितीश नायक आणि डॉ. गौतम शर्मा यांच्या देखरेखीखाली टुंडाच्या हृदयात पेसमेकर यंत्र बसवण्यात आले. टुंडाच्या वॉर्डसमोर मोठ्या संख्येत पोलिस तैनात करण्यात आले होते.