आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इजिप्तमध्ये सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य, दहशतवादाचाही मुकाबला करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत-इजिप्तमध्ये सुरक्षा संरक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासंबंधीचा करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यात यशस्वी द्विपक्षीय चर्चा झाली.

दोन्ही देशांनी दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवाद हीच दोन्ही देशांसमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळेच संरक्षण क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यावर उभय नेत्यांमध्ये सहमती झाली. सुरक्षेबरोबरच व्यापार उद्योग क्षेत्रातदेखील सहकार्य वाढविण्यावर उभय देशांत सहमती झाली. भारत-इजिप्त यांच्या जहाज क्षेत्रातदेखील सामंजस्य करार झाला आहे. कृतीवर आधारित अजेंड्यावर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीनंतर दिली. याप्रसंगी संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आले. इजिप्त हा आशिया आफ्रिकेला जोडणारा सेतू आहे. त्यामुळेच विकसनशील देश इजिप्तकडे मोठ्या अपेक्षेने पाहतात. सुरक्षेच्या करारानुसार लष्करी पातळीवर प्रशिक्षण, विविध प्रकारच्या सुविधांची आदानप्रदान, संवाद व्यवस्था पुरवली जाणार आहे.

अनेक क्षेत्रांत वाव
सिसीभारताच्या दौऱ्यावर आल्याचा १.२५ अब्ज लोकांना निश्चितपणे आनंद वाटतो. कारण दोन्ही देश अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवू शकतात. त्यादृष्टीने मोठा वाव आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

२०हजार मेट्रिक टन तांदूळ
भारतानेइजिप्तला गेल्या महिन्यात २० हजार मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केला. त्याचा सिसी यांनी बैठकीत ‘मैत्रीच्या भावा’त असा गौरवपूर्ण उल्लेख केला. अन्नधान्याच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही उभय देशांत सहमती झाली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार
संयुक्त राष्ट्राने दहशतवादाच्या उच्चाटनासंबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या करारानुसार (सीसीआयटी) कृती आराखडा करण्यात येणार आहे, असे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...