आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्चपदस्थांनी पद्मावतीवर बंदीची वक्तव्ये टाळावी : सर्वोच्च न्यायालय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/पाटणा- सार्वजनिक आणि मोठ्या पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून पद्मावती चित्रपटाबाबत हाेत असलेल्या टिप्पण्यांबाबत सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्ट म्हणाले, चित्रपटाचे मंजुरी प्रमाणपत्र प्रलंबित असताना सार्वजनिक पदांवरील लोकांची अशी वक्तव्ये अशोभनीय आहेत. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट मंजूर करावा की नाही, हे ते कसे काय सांगू शकतात?  हे चित्रपटाबाबत पूर्वग्रह राखल्यासारखे आहे. यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर परिणाम होईल. 


सरन्यायाधीश दीपक मिश्रा  यांच्या न्यायपीठाने परदेशात चित्रपट  प्रदर्शनावर बंदीच्या मागणीची याचिका फेटाळत सकाळी सुमारे ११.३० वाजता ही टिप्पणी केली. त्याच्या सव्वा तासातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात चित्रपटावर बंदीची घोषणा केली. भाजप आमदार नीरजकुमार बबलू यांच्या मागणीवर नितीश यांनी विधानसभेत बंदीची घोषणा केली.

बातम्या आणखी आहेत...