आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paid News Case Hearing Ashok Chavan, News In Marathi

राजीनामा दिला, विषय संपला; पेड न्यूजवर अशोक चव्हाणांची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेड न्यूज प्रकरण आमदारकीला आव्हान देणारे होते. त्या पदाचा राजीनामा दिल्याने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षाने घेतली. तर अपात्रतेची शिक्षा पदासच नव्हे, तर व्यक्तीसही आहे. त्यामुळे निकाल विरोधात गेल्यास त्यांना खासदारकी गमवावी लागेल. तशा लढाईस सज्ज आहोत, हे भाजपचे मत आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकांत काही वृत्तपत्रांत पेड न्यूज दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर आहे.
या प्रकरणी चव्हाणांचे वकील निवडणूक आयोगासमार हजर झाले. पण आरोपनिश्चिती करून 30 मेपासून नियमित सुनावणी होईल.
10 कोटींच्या जाहिराती वृत्तपत्रांना दिल्याचे पुरावे भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या, राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी, किन्हाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार आयोगाला दीड महिन्यात निकाल द्यावा लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त संपत यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या तीन अधिकार्‍यांची कमिटी न्यायपीठात परिवर्तीत करण्यात आली आहे. प्रकरणाचा आराखडा तयार करण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. अशोकरावांची बाजू त्यांचे वकील भंडारी यांनी मांडली. चव्हाण यांनी गुरुवारीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्या विषयाला आव्हान होते, तो राजीनाम्यामुळे संपला असल्याची बाजू त्यांनी मांडली.

दर शुक्रवारी होणार सुनावणी
दीड महिन्यात म्हणजे 20 जूनपर्यंत निकाल द्यायचा असल्याने अर्जदारांची बाजू मांडण्याची संधी मिळावी, असे किन्हाळकर यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजू लक्षात घेऊन आयोगाने दर शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, सोमय्या, नक्वी हे स्वत: किंवा त्यांचे वकील शुक्रवारी हजर नव्हते.

मुद्दा लावून धरणार
पेड न्यूजचे प्रकरण निव्वळ आमदारकीला आव्हान देणारे नाही. अशोकरावांवर अपात्रतेचा ठपका लागला तर तो सध्या उपभोगत असलेल्या पदासाठीही असेल. त्यामुळे भाजप हा मुद्दा लावून
धरील.
- डॉ. माधवराव किन्हाळकर, अशोकरावांचे प्रतिस्पर्धी