आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Paithani Saree And Puran Poli Is The First Choice Of Tourist In Hunar Hut Exhibition In Delhi

औरंगाबादच्या पैठणीला पहिली पसंती, पुरणपोळीवर परदेशी पर्यटकांचा ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयातर्फे आयोजित ‘हुनर हाट’ या प्रदर्शनात महाराष्ट्राची पैठणी व पुरणपोळीला देश-विदेशी  ग्राहक व पर्यटकांकडून पसंतीची पावती मिळत आहे. कॅनॉट प्लेस परिसरात केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयातर्फे ‘हुनर हाट’ हे देशभरातील अल्पसंख्याक समाजातील कारागिरांच्या ‘पदार्थ’ व ‘हस्त कलांचे’ विक्री  तथा  प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 
 
२६ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात औरंगाबाद येथील फईम अहमद यांचा सी-९५ हा ‘पैठणी’चा स्टॉल विशेष आकर्षण ठरला आहे. मोर, आसावली आणि कमळाच्या डिझाईनच्या ९ हजारांपासून ६० हजार रुपये किमतीच्या खास पैठणी विक्रीस उपलब्ध आहेत. पैठणीस चांगली मागणी आहे, असे अहमद यांनी सांगितले. 

मुंबईच्या अंधेरीतील मृणालिनी कांबळे यांचा ‘मुंबई तडका’ हा स्टॉल आहे. तेथील पुरणपोळीया खवय्यांचे खास आकर्षण ठरत आहे. या स्टॉलवरील खास महाराष्ट्रीय थाळी आणि वडा पाव, मिसळपाव, साबुदाणा वडा या पदार्थांनाही पसंती मिळत आहे. मुंबईच्याच महंमद फिरोज आलम यांच्या स्टॉलवरील भेल पुरी, सेव पुरी आणि वडा पावलाही मागणी आहे. 
 
हिंदीतील ‘लोकराज्य’चे कौतुक
‘मुंबई तडका’ या स्टॉलवर हिंदी भाषेतील ‘लोकराज्य’ व इंग्रजी भाषेतील ‘महाराष्ट्र अहेड’ ही महाराष्ट्र शासनाची मुखपत्रं मांडण्यात आली आहेत. या स्टॉलला भेट देणारे ग्राहक पर्यटक ही मुखपत्रंही वाचत आहेत.
बातम्या आणखी आहेत...