आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Foreign Secretary To Visit India For \'Heart Of Asia\' Meeting

पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र सचिव उद्या भारतात, शांतता चर्चेला गती मिळण्‍याची आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानचे परराष्‍ट्र सचिव एजाज अहमद चौधरी मंगळवारी 'हार्ट ऑफ आशिया' परिषदेमध्‍ये भाग घेण्‍यासाठी भारत दौऱ्यावर येत असल्‍याची माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली. चौधरी यांच्‍या भारतभेटीमुळे दोन्‍ही देशांत रखडलेल्‍या शांतता चर्चेला गती मिळू शकेल, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. पठाणकोट हल्‍ल्‍यानंतर ही चर्चा रद्द झाली होती.
15 जानेवारीला होणार होती शांतता चर्चा
> हार्ट ऑफ आशिया परिषदेमध्‍ये यूएस, चीन, रशिया, अफगानिस्तान, इराण आणि पाकिस्तानसह इतर अनेक देशांचे परराष्‍ट्र सचिव भाग घेणार आहेत.
> भारत आणि पाकिस्‍तानमध्‍ये सचिव पातळीवर 15 जानेवारी रोजी इस्लामाबादमध्‍ये होणारी शांतता चर्चा रद्द करण्‍यात आली होती.
> पठाणकोटचे हल्‍लेखोर हे पाकिस्‍तानी होते, याचे पुरावे भारताने पाकिस्‍तानच्‍या चौकशी समितीला दिले. परंतु, त्‍यांच्‍याकडून आतापर्यंत‍ ठोस कारवाई झाली नाही.
> या हल्‍ल्‍याचा मुख्‍य सूत्रधार मौलाना मसूद अजहरवर कारवाई करण्‍यासाठी हे पुरावे पुरसे नाहीत, असे पाकिस्‍तानने म्‍हटले.
> दोन्‍ही देशांत ऑगस्‍ट 2015 मध्‍ये शांतता चर्चा होणार होती. पण, पाकिस्‍तानचे उच्‍चायुक्‍त अब्दूल बासित यांनी भारतासोबतची शांतता चर्चा थांबवली होती.
कधी भेटले होते दोन्‍ही देशांचे परराष्‍ट्र सचिव
> शांतता चर्चा रद्द झाल्‍यानंतर 17 मार्च 2016 ला सार्क देशांच्‍या परिषदेमध्‍ये दोन्‍ही देशांचे परराष्‍ट्र सचिव एकमेकांना भेटले होते.
> त्‍यापूर्वी गत वर्षी मार्च 2015 रोजी भारताचे परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकर इस्लामाबादला गेले होते.
> भारत आणि पाकिस्‍तान हे दोन्‍ही देश शांतता चर्चा नव्‍याने सुरू करण्‍यास इच्‍छुक आहेत. या चर्चेला बायलेट्रेल डॉयलाग नाव दिले गेले आहे.