आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Government Printing Fake Indian Notes, Indian Intelligence Burau Infomation

पाकच्या सरकारी टाकसाळीत बनावट भारतीय नोटांची छपाई, भारतीय गुप्तचर संस्थांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बनावट नोटांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान पुन्हा एकदा उघड झाले आहे. भारतात आढळणा-या बनावट नोटा पाकिस्तानच्या सरकारी टाकसाळीत छापल्या जात असल्याचे सज्जड पुरावे रॉ, एनआयए, आयबीसारख्या भारतीय तपास संस्थांनी गोळा केले आहेत. पाकिस्तानी टाकसाळीकडून वापरला जाणारा कागद व शाईच या बनावट नोटांमध्ये आढळली आहे.
गुप्तचर संस्थांनी याबाबतची माहिती गृह व अर्थ मंत्रालयासह आर्थिक घडामोडींविषयक संसदेच्या स्थायी समितीलाही दिली आहे. यानुसार, बनावट नोटांमध्ये जीएसएमचा कागद वॅक्सपिक क्विटेंट व ऑलीविनी पेपरचा वापर केला जात आहे. सन 2010 ते 2011पर्यंत पाकमध्ये 1700 ते 1900 कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात आल्या. दुसरीकडे, सन 2012 पासून आतापर्यंत 3,500 ते 4,000 कोटी रुपयांच्या बनावट नोटांची छपाई झाली. बांगला देश, नेपाळ, थायलंड, मलेशिया, श्रीलंका व चीनमधून या खोट्या नोटा भारतात आणल्या जात आहेत.