नवी दिल्ली - पाकिस्तानी हॅकर्संनी राजस्थान अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी)ची वेबसाइट हॅक करून कारगील युद्धावर आधारित कार्टून अपलोड केले आहे. या कार्टूनमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा लिहिला असून, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जरनल परवेज मुशर्रफ हे भारतीय सेनेला धमकी देताना दिसत आहेत. शिवाय 'कारगील विसरले का?' असा संदेशही यावर लिहिला आहे.
ACB च्या साइटवर लिहिले 'पाकिस्तान जिंदाबाद'
पाकिस्तानी हॅकर्संनी राजस्थान एसीबीच्या साइटवर कार्टून अपलोड करून त्यावर 'पाकिस्तान जिंदाबाद' लिहिले आहे. कार्टूनमध्ये भारतीय जनावांच्या मृतदेहाजवळ मुशर्रफ उभे आहेत आणि त्यांच्या बाजूला लिहिले आहे की, 'अरे माझ्या मुलांनो, युद्ध करण्यापूर्वी अगोदर तयारी तरी करा. तुम्ही जेव्हाही कधी पाकिस्तानसोबत युद्ध केले तेव्हा तेव्हा तुमचे मृतदेह सोडून पळून गेले. कारगील विसरले ? ' असा संदेशही त्यावर लिहिला आहे.
100 पेक्षा अधिक फोटोज केले अपलोड
हॅक केलेल्या साइटवर हॅकरांनी मुशर्रफ यांच्या कार्टून शिवाय भारताला लक्ष्य करताना 100 पेक्षा अधिक फोटो अपलोड केले आहेत. यात 1965 आणि कारगील युद्धाचेही काही फोटो आहेत. ज्यात भारतीय सैन्याला मृतदेह पाकिस्तानी रेंजर्स मृतदेह देताना दिसत आहेत. या शिवाय फोटोमध्ये 1947, 1948 चा उल्लेख केलेला आहे. ' आमच्या सोबत नडाल तर तुमचे हेच हाल होतील' असेही त्यात म्हटले. हॅकर्सने अपले नाव मोहम्मद बिलाल अँड काई H4X0r लिहिले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा पाकिस्तानी हॅकर्संनी अपलोड केलेले PHOTOS: