आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak High Commission In Touch With Kashmiri Separatists

पाकिस्तानी दूतावासाचे फुटीरतावाद्यांशी संधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरमधील फुटीरतवाद्यांचे सख्य ही लपून न राहिलेली गोष्ट नाही. या संवेदनशील मुद्द्यामुळे भारत - पाक चर्चा अनेकदा फिस्कटली आहे. ही बाब लक्षात घेऊन पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी काश्मिरी फुटीरवाद्यांच्या नियमित संपर्कात आहेत. केवळ भारत - पाक परराष्ट्र सचिवांच्या बैठकीआधी कुठलाही वाद उद््भवू नये म्हणून त्यांच्याशी वैयिक्तक संपर्क ते टाळत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाने या आठवड्यात पाक समर्थक फुटीरतावादी नेता आसिया अंद्राबी हिच्याशी फोनवर बोलणी केली आहे. अंद्राबीचा इस्लामी ग्रुप दुख्तर ए मिल्लत ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचा घटक आहे. अंद्राबीने गेल्यावर्षी मार्चमध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीयदिनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकवला होता. तसेच पाकिस्तानी राष्ट्रगीत गायिले होते. अंद्राबीवर या दोन्ही प्रकरणांत खटला सुरू आहे. भारतासोबत होणाऱ्या कोणत्याही मोठ्या चर्चा, बैठकीपूर्वी पाक काश्मिरी फुटीरतवाद्यांशी चर्चा करत आला आहे. त्यामुळे ही चर्चा प्रक्रियाच संकटात सापडते. गेल्या वर्षभरात याच मुद्यावरून एनएसए व परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाने पुरेशी खबरदारी घेत फुटीरतावाद्यांचे संबंध उघड होऊ नयेत म्हणून खबरदारी घेत आहे.

तथापि सूत्रांनुसार पाक उच्च आयुक्त कार्यालयाने हुरियत नेत्यांनी केलेला वैयक्तिक भेटीचा आग्रहदेखील पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांनी फुटाळून लावला आहे.