आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Invites Recently Released Hurriyat Leader Masarat Alam For National Day Celebrations

पाकिस्तान दिवस साजरा करण्यासाठी जमले फुटीरतावादी नेते, मसरत आलमलाही निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरसह देश भर ज्याच्या मुक्ततेची चर्चा झाली तो फुटीरतावादी नेता मसरत आलमला पाकिस्तानच्या नॅशनल डे सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त बासित अली यांनी 23 मार्च रोजी यौम-ए-पाकिस्तान यासोहळ्यासाठी मसरतला निमंत्रण दिले. मात्र, मसरत या सोहळ्याला उपस्थित राहाणार नसल्याचे वृत्त आहे. मसरतशिवाय अनेक फुटीरतावादी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या या नव्या भूमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये सुरु झालेली चर्चा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मसरत आलमच्या सुटेकनंतर देशाचे राजकारण ढवळून निघाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा सहकारी पक्ष पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद यांच्या या निर्णयामुळ केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. संसदेत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारने जम्मू-काश्मीर सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

बासित अली यांनी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांची घेतली भेट
जवळपास आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान उच्चायुक्त आणि हुरियत नेत्यांमध्ये चर्चेचा 'सिलसिला' रविवारी पुन्हा सुरु झाला. हुरियतचे उदारमतवादी गटाचे नेते मीरवाइज उमर फारुक यांनी शिष्टमंडळासह पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांची भेट घेतली. मीरवाइज 'पाकिस्तान दिवस' सोहळ्यासाठी बासित यांच्या निमंत्रणावर सात हुरियत नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला आले आहेत. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर त्यांनी पाक उच्चायुक्तांची एकांतात भेट घेतली. यात त्यांनी परराष्ट्र सचिव स्तरीय चर्चेबद्दल जाणून घेतले आणि काश्मिरच्या सद्यस्थितीची माहिती दिली. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये हुरियत नेत्यांची पाक उच्यायुक्तांनी भेट घेतली होती, त्यानंतर सचिव स्तरीय चर्चा रद्द करणार्‍या केंद्र सरकारने या भेटीला फार महत्त्व दिलेले नाही. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी फुटीरतावादी नेत्यांच्या या भेटीला सामाजिक कार्यक्रमातील भेट म्हटले आहे.

का साजरा होतो पाकिस्तान दिवस?
ब्रिटीश काळात मुस्लिम लीगने 23 मार्च 1940 रोजी लाहोर येथे पाकिस्तानाला स्वायत्त आणि सार्वभौम मुस्लिम राष्ट्र करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि हा प्रस्ताव मंजूर झाला होता. या प्रस्तावाला लाहोर करार आणि पाकिस्तान करार नाव देण्यात आले होते. पाकिस्तानची निर्मीती झाल्यानंतर 1956 मध्ये याच दिवशी पाकिस्तानने संविधान स्विकारले होते. त्यामुळे दरवर्षी हा दिवस 'पाकिस्तान दिन' म्हणून साजरा केला जातो.