आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट: मसूदच होता दहशतवाद्यांचा हँडलर, सरकारने सोडले होते कंधारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद - पठाणकोटमधील हवाई दलाच्‍या तळावर हल्‍ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा हँडलर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मौलाना मसूद अजहर, त्‍याचा भाई रउफ आणि अन्‍य दोन साथिदार असल्‍याचे उघड झाले. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएच्या सरकारच्‍या काळात 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे हायजॅक झालेले विमान सोडवण्यासाठी अझहरला अफगाणिस्तानातील कंधार येथे नेऊन सोडण्यात आले होते.

अझहरच्या संपर्कात होते दहशतवादी
अशी माहिती आहे, पठाणकोट एअरबेसवर हल्ल्या करणाऱ्यांनी पाकिस्तानातील बहावलपूर येथे सॅटेलाइट फोनवरून चर्चा केली होती.
- गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार अझहरचा मुक्काम बहावलपूर येथेच आहे. तो जैशच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो.
- दहशतवाद्यांनी बहावलपूर येथे मसूद अझहरसोबतच्‍या संभाषणात कोडवर्डचा वापर केला होता, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली.
सरकारने दिले पुरावे
पठाणकोट हल्ल्यासंदर्भातील सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान त्यावर कोणती कारवाई करतात, हे पाहायचे आहे, असे म्‍हणत परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते विकास स्वरुप यांनी चेंडू पाककडे भिरकावला. पाकिस्तानबाबत भारताचे धोरण स्पष्ट आहे. आम्हाला शेजारी देशांसोबत मैत्री हवी आहे. मात्र, दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्‍हणाले.
शरीफ यांनी पठाणकोट हल्‍ल्यासंदर्भात घेतली बैठक...
- नवाझ शरीफ यांनी पठाणकोट दहशतवादी हल्‍ल्यासंदर्भात आज महत्‍त्‍वाची बैठक घेतली.
- यामध्‍ये सरताज अझीझ, राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार नासिर जंजुआ, लष्‍करप्रमुख राहिल शरीफ यांच्‍यासह काही अधिकारी सहभागी होते.
- पठाणकोट हल्‍ल्यानंतर भारताने घेतलेली कठोर भूमिका पाहून ही बैठक घेण्‍यात आली.
- सायंकाळी उशीरापर्यंत पाक सरकार यासंदर्भात महत्‍त्वाची भूमिका मांडू शकते.
- नवाझ यांनी आयएसआयच्‍या अध्‍यक्षांसोबत फोनवरून संपर्क केल्‍याचीही माहिती आहे.
शेजारी देशाच्‍या संबंधांवर काय म्‍हणाले विकास स्वरूप...
- भारताला सर्व शेजारी देशांसोबत मैत्रीचे संबंध ठेवायचेत. मात्र, दहशतवादी कारवाया खपून घेतल्‍या जाणार नाहीत.
- पाकिस्तानसोबत मैत्रीसाठी आम्‍ही हात पुढे केला होता.
- पठाणकोट हल्‍ल्यानंतर दहशतवाद पुन्‍हा गंभीर बाब बनली आहे.
- आता दहशतवादाविरोधात पाकला कारवाई करायची आहे. भारत त्‍याची वाट पाहणार आहे.
- त्‍यांनी परराष्ट्र सचिव बैठकीवर बोलण्‍यास नकार दिला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, हल्‍ल्‍यानंतर नवाझ यांनी मोदींना केला होता फोन, काय म्‍हणाले मोदी..
बातम्या आणखी आहेत...