आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलओसीच्या अनेक तळांवर पाककडून एकाच वेळी हल्ले; संदीप शहीद, पाच जवान जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/दिल्ली- पाकिस्तानकडून जम्मू-काश्मिरातील अनेक चौक्यांवर गुरुवारी सायंकाळी एकाच वेळी बेछूट गोळीबार करण्यात आला. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगत झालेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले. जखमी जवानांना एअर अॅम्ब्युलन्सने उधमपूर जम्मूच्या लष्करी रुग्णालयात आणण्यात आले.

भारताकडून झालेल्या कारवाईत अनेक पाकिस्तानी रेंजर्स जखमी झाले. गोळीबाराच्या काही तास आधी तंगधारमध्ये लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. या वेळी चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. या घुसखोरीत अतिरेक्यांच्या बरोबरीने पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे सीमा कृती दलही सहभागी होते. पाकिस्तानी कमांडो नियंत्रणरेषेच्या एवढे जवळ येण्याची ही पहिलीच वेळ होती. सकाळी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना लष्कराचे जवान संदीपसिंह रावत शहीद झाले.

नापाक मनसुबे हाणून पाडले...
कश्मीरच्या तंगधारमध्ये गुरुवार सकाळी गस्ती पथकावर हल्ला झाला. घुसखोरी रोखताना चकमकीत संदीपसिंह रावत शहीद झाले.

युद्धाला तोंड फुटले आहे, येणे अवघड : जवानाचा निरोप
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात हेरगिरीचे नेटवर्क सुरू होते. या प्रकरणात पाक गुप्तचर संस्था आयएसआयचा कारिंदा महमूद अख्तर पकडला गेला. त्याच्याकडे बनावट आधार कार्ड सापडले.

मोतिहारी (बिहार)- पाकच्या बुधवारी रात्रीच्या गोळीबारात बीएसएफ कॉन्स्टेबल जितेंद्रकुमार शहीद झाले. ते मोतिहारी जिल्ह्यातील होते. त्यांची मुलगी अर्चना म्हणाली, युद्ध सुरू झाल्याने येणे कठीण असल्याचे ते आठवड्यापूर्वीच म्हणाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...