आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरगिरीच्या आरोपात समाजवादी पक्षाचे खासदार मुनव्वर यांच्या PA ला अटक, चौकशी सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली पोलिसांनी पाकस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नागौर येथील मौलाना रमजान आणि सुभाष जहांगिर यांना अटक केली आहे. - Divya Marathi
दिल्ली पोलिसांनी पाकस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नागौर येथील मौलाना रमजान आणि सुभाष जहांगिर यांना अटक केली आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हायकमीशनमधून सुरु असेलेल्या हेरगिरी रॅकेटमधील चौथा आरोपी फरहतला शनिवारी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहे. आरोपी फरहत समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य चौधरी मुनव्वर सलीम यांचा पीए म्हणून काम करीत होता. गुरुवारी दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान हायकमीशनमधील व्हिसा ऑफिसर मेहमूद अख्तरसह तिघांना अटक केली होती. मेहमूद आयएसआय एजंट होता. त्याला हेरगिरीसाठी भारतात पाठवण्यात आले होते. त्याची भारताने हकालपट्टी केली आहे.

26/11 सारख्या हल्ल्याची होती ISI ची तयारी
- गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दावा केला आहे, की पाकिस्तान उच्चायुक्तालयात बसून अख्तर देशातील समुद्री मार्गांची माहिती गोळा करत होता. त्याचा उद्देश गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनारा असलेल्या शहरांमध्ये 26/11 सारखा हल्ला करण्याचा होता.
- पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानमधील मौलाना रमजान आणि सुभाष जहांगिर यांच्याकडे बीएसएफच्या गुजरात आणि राजस्थानमधील तैनातीची माहिती सापडली आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...