आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pak Terrorist Involved In Murder Of Indian Soliders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद्यांची ‘नापाक’ अ‍ॅक्शन टीम, सोमवारच्या घटनेत पाक बॉर्डर अ‍ॅक्शन टीमचाच हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंग करणा-या दबा धरून हल्ला करण्यामागे ‘पाक बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’चा हात असल्याचे उघडकीस आले आहे. ही टीम पाक लष्कराकडून प्रशिक्षण मिळालेले सैनिक व दहशतवाद्यांचा समावेश असलेले पथक आहे. प्रत्येक तुकडीत दहा हत्यारबंद लोक असतात. त्यात सात दहशतवादी आणि पाक लष्करातील तीन सैनिकांचा सहभाग असतो. ते सर्वजण लष्करी वेशात येऊन हल्ला करतात. मात्र, त्या वेळी त्यांच्या पोशाखावर अधिकृत बॅच बिल्ला नसतो. आयबी आणि एमआयच्या अहवालात या बाबीचा खुलासा झाला आहे.


गोपनीय अहवालानुसार पाकिस्तान बॉर्डर अ‍ॅक्शन टीमच्या तुकडीने लष्कराच्या देखरेखीत या पूर्वनियोजित कारवाईला मूर्तरूप दिले. लष्कराच्या टेहळणी पथकाकडून (सर्व्हिलान्स) भारतीय जवान कोणत्या भागात गस्त घालत आहेत, त्यांची संख्या किती आहे, आदी माहिती घेतली जाते. त्यानंतर अशा कारवाया केल्या जातात. या टीममध्ये शक्यतो स्थानिक गावांतील युवकांची भरती केली जाते. कारण त्या भागाची त्यांना चांगली माहिती असते. या युवकांना लष्करी सैनिकांकडून प्रशिक्षण देऊन पोशाख दिला जातो, पण या पोशाखावर लष्करी चिन्ह, नामपट्टिका नसते. त्यामुळे पकडले गेल्यानंतर ते लष्करी जवान नव्हे तर दहशतवादी असल्याचा दावा करता येतो आणि जर हे तरुण मारले गेले तर गोळीबार करून पाक सैनिकांना मारल्याचा आरोप भारतावर करण्यात येतो.
अशी झाली कारवाई : पाक बॉर्डर अ‍ॅक्शन टीमच्या दोन तुकड्यांनी मिळून हल्ला केला. त्यात 20 पाकिस्तानी सैनिक व 14 दहशतवादी होते. गुप्तचरांच्या अहवालानुसार सोमवारी सायंकाळपासूनच ते जंगलात दबा धरून बसले होते. रात्री भारतीय सीमा दलाची तुकडी गस्त घालण्यास आली असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिले, परंतु त्यांची संख्या जास्त होती. गुप्तचरांच्या एक ऑगस्टच्या अहवालात या संभाव्य घटनेचा उल्लेख होता.


भारत-पाक संबंधांवर परिणाम
या घटनेचे परिणाम भारत-पाकिस्तान संबंधांवर होतील. दोन्ही देशांना परस्पर संबंध मजबूत करण्याचे प्रयत्न करताना एक बाब समजून घेतली पाहिजे की, पाकिस्तानात संरक्षण आणि सामरिक मुद्द्यांवर राजकीय सहमती आहे. ते या मुद्द्यावर एका स्पष्ट रणनीतीअंतर्गत काम करत आहेत. आपल्याकडे कूटनीती पातळीवर परराष्ट्र धोरण आहे. पाकसोबत संबंध सुधारण्याची भाषा ते बोलतात. परंतु त्याचे मार्ग काय आहेत, त्याचा उद्देश काय आहे हे स्पष्ट नाही. तसेच राजकीय पातळीवरही त्याबाबत एकवाक्यता दिसत नाही.’
सी. उदय भास्कर, संरक्षणतज्ज्ञ


आदेश द्या, तासात तळ उद्ध्वस्त
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या 26 दहशतवादी प्रशिक्षण तळ सुरू आहेत. याची माहिती भारत सरकारलादेखील आहे, परंतु आम्ही हातावर हात ठेवून बसलो आहोत. कारण भारताचे ठोस धोरणच निश्चित नाही. पाक आणि चीन हे समजून चुकले आहेत की, भारताचे वर्तमान नेतृत्व कुचकामी आहे. त्यामुळेच ते सीमेवर दरदिवशी कुरापत काढत आहेत. पाकने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माझ्या मते आता भारताने ठोस कृती करायला हवी. आदेश दिल्यास लष्कर अर्ध्या तासात सगळे तळ नेस्तनाबूत करून टाकील.’
ओ. पी. कौशिक, लेफ्टनंट जनरल