आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावर हल्ल्यामागे RAW!!! पाकिस्‍तानात भारताला जबाबदार ठरवण्याची घाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेशावर हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानात भारताच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असल्याचे चित्र आहे. दहशतवादी हाफीज सईद याने आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या बालसंहारासाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. तसेच या प्रकरणाचा बदला घेण्याची धमकीही दिली आहे. त्या पाठोपाठ आता एका वेबसाईटनेही हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याचा दावा केला आहे.
दन्‍यूजट्राइब.कॉम या वेबसाईटवरील वृत्तानुसार पाकिस्तानच्या मिलेट्री इंटेलिजंस एजंसीजने पेशावरमध्ये हल्ला करणा-या दहशतवाद्यांचे फोनवर झालेले बोलणे इंटरसेप्‍ट केले आहे. त्याच्या आधारे हल्ल्यात भारतीय गुप्तचरसंस्था रॉचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ यांना हल्ल्यात भारतीय आणि अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थांचा हात असल्याचे पुरावे देण्यात आले आहेत, असा उल्लेखही बेवसाईटने केला आहे.
यापूर्वी दहशतवादी हाफीज सईदने त्याच्या भाषणात खुलेआम भारतावर या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप आणि टीका करण्यात आली होती. तसेच अमेरिका आणि इस्रायलही यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते.
पुढे वाचा - बेवसाईटवर लावण्यात आलेले आरोप...