आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक उच्चयुक्तांना अपघातानंतर मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या गाडीने दुचाकीला धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने कारमधील उच्चायुक्त व त्यांच्या चालकाला मारहाण केली. अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पाकिस्तानने घटनेचा निषेध नोंदवला आहे. भारताने चौकशीची मागणी फेटाळली असून, हा मुत्सद्द्यावरील हल्ला नसून, अपघातानंतर उद्भवलेला वाद आहे. पोलिसांनुसार पाक उच्चायुक्तालयातील प्रथम सचिव (व्यापार) झरगाम रझा यांची कार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाजवळ एका दांपत्याच्या दुचाकीला धडकली होती. त्यानंतर गर्दी जमली. चालक हैदर यास जमावाने धक्काबुक्की केली. यात रझा यांनाही थोडेसे खरचटले.

दरम्यान, पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने म्हटले आहे की, रझा आपल्या घरी परतत होते. रस्त्यात दुचाकीस्वाराने त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. जमावाने चालक व रझा यांच्याशी धक्काबुक्की केली, असाही आरोप उच्चायुक्तालयाने केला आहे.