Home »National »Delhi» Pakistan Army Champions Trophy Win Qamar Bajwa Ispr

विजयाला राजकीय वळण देण्याचा पाकिस्तान आर्मीचा प्रयत्न, म्हणाले खेळाडूंना 'उमरा'साठी पाठवा

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 16:42 PM IST

नवी दिल्ली-चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियविरूद्ध पाकिस्तानने मिळवलेल्या विजयाला तेथील आर्मी राजकिय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचे पालडे जड होताना दिसताच पाकिस्तानी सेनेच्या ISPR ने ट्विट करण्यास सुरूवात केली होती. पाकिस्तानचे आर्मी प्रमुख यांनी स्वत: हा सामना पाहिला. पाकिस्तानने सामना जिंकताच 'खेळाडू हे सैनिकांप्रमाणे आहेत आणि त्यांना उमरासाठी मक्का येथे पाठवण्यात येईल' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काय प्रकरण...?
- ISPR ने आपल्या ट्विटर हॅन्डलवर अनेक फोटो आणि ट्विट केले आहेत. यात एक ट्विट श्रीनगर येथे करण्यात आलेल्या जल्लोषाचाही होता.
- एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी टीमला उमरासाठी मक्का येथे पाठवण्यात येईल. उमरा ही एक इस्लामिक परंपरा असून साऊदी येथील मक्कामध्ये ही प्रथा पार पाडण्यात येते.
- उमराची घोषणा करून पाकिस्तानी आर्मीने क्रिकेटला धर्म आणि राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
खेळ नाही युद्ध...
- पाकिस्तान आर्मीने सामन्याला युद्धाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सामना सुरू असताना केलेल्या ट्विटमध्ये दुश्मन आणि युद्ध अशा शब्दांचा वापर करण्यात आला.
- आर्मी प्रमुख बाजवा टीमच्या खेळाची तुलना सैन्याशी करतांना म्हणाले की, हे सर्व संकटांच्या विरोधात आहे.
- ISPR ट्विटमध्ये खेळाडूंना सतर्क आणि शुर सैनिक असे संबोधण्यात आले. यात पुढे म्हटले की खेळाडू दुश्मनाच्या प्रत्येक चालीवर मात करण्यात यशस्वी राहतील.
- एक फोटो बलूचिस्तानमध्ये जल्लोष करतानाचादेखील पोस्ट करण्यात आला.

Next Article

Recommended