आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Army Was Against Nawaz Sharif Trip To India BJP Modi

मच्छिमारांसाठी \'अच्छे दिन\', पाक 151 जणांना सोडणार, शरीफ यांच्या दौ-यापूर्वी निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपने निवडणूक प्रचारात 'अच्छे दिन आले वालै है' अशी जाहिरात केली होती. मोदींना बहुमत मिळाले असून ते उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतरच त्यांनी जाहिरातीतून दिलेले हे वचन खरचं पूर्ण होणार का हे समजेल. पण पाकिस्तानच्या कैदेत असणा-या भारतीय मच्छिमारांसाठी मात्र मोदींच्या शपथविधीआधीच 'अच्छे दिन' आले आहेत. त्याचे कारण म्हणजे शरीफ यांच्या भारताच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 151 मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच श्रीलंकेनेही त्यांच्या ताब्यातील मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शरीफ यांच्या भारत दौ-यामुळे दोन्ही देशांच्या काही गटांची नाराजी समोर येत आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआयचाच या दौ-यासाठी विरोध होता. मात्र, नवाज शरीफ यांचे भाऊ आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्‍यमंत्री शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी रात्री पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल रहील शरीफ यांची भेट घेतली व त्यांना यासाठी राजी केले.

दुसरीकडे शरीफ यांच्या दौ-याच्या निर्णयावर पाकिस्तानातील कट्टरवादी संघटनांमध्ये संतापाची भावना आहे. जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याने हा प्रकार म्हणजे भारताच्या तुष्‍टीकरणचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष असणा-या शिवसेनेतूनही या दौ-याच्या विरोधी सूर उमटायला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री शपथविधीला उपस्थित राहणार का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान शिवसेना आज बैठकीमध्ये या मुद्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
पुढे वाचा - शिवसेनेमध्ये संभ्रम?