आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Army Was Against Nawaz Sharif Trip To India BJP Modi

\'अच्छे दिन आ गये\' पाकमधून 151 मच्छीमारांची सूटका; \'वाघा\' बॉर्डरवर भारताच्या स्वाधीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लाहोर- 'अच्छे दिन आने वाले है', असा विश्वास भारतीय जनतेला देऊन पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या दिवशी देशाला एक खुशखबर मिळाली आहे. पाकिस्तानने भारताच्या 151 भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. रविवारी या भारतीय कैद्यांची सुटका करण्‍यात आली होती. वाघा सीमेवर आज (सोमवार) सगळ्या कैद्यांना भारतीय प्रशासकीय अधिकार्‍यांच्या स्वाधीन करण्‍यात आले. या घटनेमुळे भारत-पाक संबंधीच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे.

नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (26 मे) शपथ घेतली. पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय मच्छिमारांची सुटका करण्‍याचा निर्णय गेल्या दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार वाघा सीमेवर सोमवारी 151 मच्छिमारांनी भारताच्या स्वाधीन करण्‍यात आले.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भारताच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर कैदेत असलेल्या भारतीय मच्छिमारांची सूटका करण्‍याचा निर्णय घेण्यात आला होताे. सगळ्या मच्छिमारांना सीमा ओलांडल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तसेच तसेच श्रीलंकेनेही त्यांच्या ताब्यातील मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानची राजधानी कराचीमधील मलिर या जिल्हा कारागृहातील 59 तर हैदराबादमधील नारा तुरुंगात कैद असलेल्या 92 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.
दरम्यान, शरीफ यांच्या भारत दौ-यामुळे दोन्ही देशांच्या काही गटांची नाराजी समोर येत आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआयचाच या दौ-यासाठी विरोध होता. मात्र, नवाज शरीफ यांचे भाऊ आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्‍यमंत्री शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी रात्री पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल रहील शरीफ यांची भेट घेतली व त्यांना यासाठी राजी केले.

दुसरीकडे शरीफ यांच्या दौ-याच्या निर्णयावर पाकिस्तानातील कट्टरवादी संघटनांमध्ये संतापाची भावना आहे. जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याने हा प्रकार म्हणजे भारताच्या तुष्‍टीकरणचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष असणा-या शिवसेनेतूनही या दौ-याच्या विरोधी सूर उमटायला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री शपथविधीला उपस्थित राहणार का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान शिवसेना आज बैठकीमध्ये या मुद्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, भारत दौर्‍यावर आलेल्या शरीफ यांचा नियोजित कार्यक्रम