आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी बोटप्रकरणी डीआयजी निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानी बोट बुडाल्याप्रकरणी सरकारच्या वक्तव्याविरोधात टीका केल्याच्या कारणावरुन तटरक्षक दलाचे डीआयजी बी. के. लोशाली यांना निलंबित करण्यात आले आहे.
तटरक्षक दलाच्या एका अधिका ऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीत ते दोषी आढळून आले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जारी झालेली त्यांची कोर्टमार्शलची कारवाई पूर्ण झाली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री तटरक्षक दलाने गुजरातच्या तटावर मासेमारी करणाऱ्या एका पाकिस्तानी बोटीला घेराव घातला होता. दरम्यान, बोटीत स्फोट झाल्याने त्यातील चार जणांसह ती बुडाली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तेव्हा केलेल्या वक्तव्यानुसार, बोटीत स्वार संशयीत दहशतवादी होते आणि जवानांनी घेराव घातल्याने त्यांनी स्वत:च स्फोट करून आत्महत्या केली. दरम्यान, लोशाली यांच्या मते, बोट उडवण्याचे त्यांनी आदेश दिले होते. या मुळे सरकार आणि तटरक्षक दलाला नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांची उत्तर पश्चिम विभागाच्या चीफ ऑफ स्टाफ पदावरुन हटवून गांधीनगरच्या प्रादेशिक मुख्यालयात बदली करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये डीआयजी लोशाली यांनी तटरक्षक दलाचे जवान आणि एलअँडटीच्या अधिका ऱ्यांना संबोधित केले होते. त्यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. "आपणास, ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेल. आपण पाकिस्तानची बोट उडवून दिली. तेव्हा मी गांधीनगरला होतो. त्यांना आपण बिर्याणी खाऊ घालू इच्छित नव्हतो. बोट उडवण्याचे आदेश मीच दिले.
बातम्या आणखी आहेत...