आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Cross Firing At Indo Pak Border Hm Rajnath Singh Holds Meeting

पाकिस्तानचा गोळीबार सुरुच, जवान शहीद; सीमेवरील पाच हजार नागरिकांचा जीव मुठीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी द‍िल्ली- आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरु झाला आहे. आज (सोमवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाक सैन्याने सांभा, कठुआ आणि हीरानगर भागात अंदाधुंद गोळीबार केला. त्यात सीमा सुरक्षारक्षक दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. तसेच सीमेवरील 57 भारतीय गावांमधील पाच हजार नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

कठुआचे पोलिस उपायुक्त डॉ. शाहिद इकबाल चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानाकडून अंदाधुंद गोळीबार सुरुच असल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर कठुआ भागातील शाळा बंद ठेवण्‍यात आल्या आहेत. कठुआ भागातील 3700 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे डॉ.चौधरी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पाकिस्तान सैन्याने रविवारी रात्रीपासूनच कठुआ सेक्टरमधील बोबियान आणि पनसर भागात गोळीबार सुरु केल्याचे डॉ. शाहिद इकबाल यांनी सांगतले. गेल्या सात दिवसांत पाच लोकांचा मृत्यु झाला आहे. त्यात बीएसएफच्या तीन जवानांचा समावेश आहे.
पाकिस्तान सैन्याने सोमवारी सकाळी बीएसएफच्या सहा छावण्यांना टार्गेट केले. जम्मू-काश्मीरमधील बोबीया आणि पंसार सेक्टरमध्ये रविवार रात्री अधून मधून गोळीबार केला जात होता. गोळीबार करून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मार्ग मोकळा करुन देण्यात येत आहे. मात्र, बीएसएफचे जवान पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत.