आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदलाही पाकचे तोंड कडूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/नवी दिल्ली - भारताने पुन्हा एकदा तणाव विसरून ईदच्या दिवशी पाकिस्तानचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकने शुक्रवारपासून सीमेवर जाेरदार गोळीबार सुरू केला आहे. इतकेच नव्हे तर ईदनिमित्त बीएसएफने पाठवलेली मिठाई परत करत शुभेच्छाही नाकारल्या.
ईद साजरी करणाऱ्या पूंछ व राजौरीच्या २ गावांवर पाक सैनिकांनी गोळीबार केला. यात दोन महिला गंभीर तर इतर दोन जण जखमी झाले. मात्र, पाकमध्येही ईद साजरी होत असल्याचे भान ठेवून भारताने मोठ्या शस्त्रास्त्रांनी प्रत्युत्तर दिले नाही.
दुसरीकडे, सीमेवर निर्माण झालेल्या तणावाबाबत काँग्रेसने मोदी सरकारवरच प्रश्नचिन्ह उभे केले. पक्षाचे नेते आरपीएन सिंह म्हणाले की, उफामध्ये पाकसोबत संयुक्त वक्तव्यातून काय मिळाले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सांगितले पाहिजे.

"ते' ड्रोन चायना मेड
बीजिंग | नियंत्रण रेषेवर भारताचे हेरगिरी करणारे ड्रोन पाडल्याचा दावा अखेर खोटा ठरला आहे. चीनच्या सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीच्या पीपल्स डेली वृत्तपत्रानेही पाकला खाेटे ठरवले अाहे. हे ड्रोन चीनमध्येच तयार झालेले ‘डीजेआय फँटम ३’ ड्रोन असल्याचे पीपल्स डेली वृत्तपत्राने स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...