आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Faces More Causality Than India In Cross Border Firing Incidents

शस्त्रसंधी उल्लंघनाचा फटका पाकलाच, भारतापेक्षा झाले चारपट अधिक नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या विषयावर मंगळवारी दोन्ही देशांचे (डीजीएमओ) डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स स्तरावरील बैठक झाली. यात दोन्ही देशांचे फ्लॅग मिटींगबाबत एकमत झाले. तसे पाहता ही बैठक दर आठवड्याला होत असते. पण पाकिस्तानच्या वर्तणुकीत काहीही बदल दिसून येत नाही. पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार केला जात असल्याने भारत सरकारनेही सैन्याचे हात मोकळे सोडले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानला भारताच्या तुलनेत चारपट अधिक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच (16 ऑगस्टला) पाकिस्तानकडून सुरू झालेल्या फायरिंगला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने केलेल्या गोरीबारात एकूण 8 जण नागरिक मारले गेले असल्याची माहिती आहे. त्यात पाकिस्तानच्या सैन्याचे जवान, लश्करचे दहशतवादी आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. भारतातील मात्र दोघांचाच मृत्यू झाला आहे. हा प्रकार जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर घडला आहे. याठिकाणी बीएसएफचे जवान तैनात आहेत. 2013 मध्ये पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात 12 भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले होते. तर यावर्षी केवळ 1 बीएसएफ जवान मारला गेला आहे.
लोकवस्ती लक्ष्य नाही?
काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री राजनाथ सिंह यांची एनएसएचे प्रमुख अजित डोभाल आणि बीएसएफचे महासंचालक डी.जे.पाठक यांची भेट घेतली होती. त्यात भारत-पाक सीमेवर वाढलेल्या तणावासंदर्भात चर्चा झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार बीएसएफला कारवाईसाठी पूर्ण सहकार्य करत आहे. सीमा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर बर देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. तर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या प्रकाराला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे बीएसएफच्या महासंचलकांनी सांगितले. तसेच पाकिस्तानच्या नागरिकांना लक्ष्य केले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील स्लाइडमध्ये, कारवाई सुरू राहणार, बीएसएफ ठाम